भायखळ्यात रंगला पावसाळी हॉलिबॉलचा खेळ

मुंबई, दि २८
पावसाची रिमझिम आणि खेळाडूंचा ओसंडून वाहणारा जल्लोषपूर्ण वातावरणात शिवसेना भायखळा, शाखा क्र. २१० आयोजित आमदार चषक २०२५ ही भव्य हॉलिबॉल स्पर्धा माझगाव संपन्न झाली. तब्बल १६ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गणेश इलेव्हन हत्तीबाग या संघाने विजेतेपद तर ताराबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ संघाने उपविजेतेपद पटकावले. माझगांवच्या लाल मैदान संघाला तिसरे तर ताडवाडीच्या प्रतिज्ञा क्रीडा मंडळाला चौथे स्थान मिळाले.
उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिमाखदार स्पर्धेचे उदघाटन ताराबाग ऐक्यवर्धक सोसायटी, ताराबाग, माझगांव येथे शिवसेना उपनेते तथा विभागप्रमुख यशवंत जाधव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित संघांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार यामिनी यशवंत जाधव प्रमुख उपस्थित होत्या. भायखळा परिसरातील तब्बल १६ संघांच्या सहभागामुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. रविवारी रात्री उशीराने स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने झाले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पावसाच्या रिमझिम हजेरीने खेळाडूंचा उत्साह आणखी वाढत होता. सध्या सर्वत्र क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांचा बोलबाला असताना हॉलिबॉल सारखी स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संयोजकांचे क्रीडाप्रेमींनी विशेष कौतुक केले. शिवसेना भायखळा विधानसभा समन्वयक संतोष राणे आणि शाखा क्र. २१० चे शाखाप्रमुख राकेश खानविलकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
उदघाटन समारंभाला तसेच पारितोषिक वितरण समारंभाला शिवसेनेचे भायखळा विधानसभाप्रमुख विजय (दाऊ) लिपारे, समन्वयक संतोष राणे, संघटक कृष्णा रेणोसे, सह समन्वयक हेमंत मयेकर, प्रशांत आडारकर, सह संघटक उदय बेलवलकर, उपविभाग प्रमुख देवेंद्र कदम, शाखा क्रमांक २१० शाखाप्रमुख राकेश खानविलकर, मेघा भोईर, गौरव कासले, ओंकार पवार तसेच शिवसेनेतील अन्य सहकारी उपस्थित होते . KK/ML/MS