महाराष्ट्र कन्या दिव्या देशमुख नवी महिला बुद्धिबळ जागतिक विजेती

 महाराष्ट्र कन्या दिव्या देशमुख नवी महिला बुद्धिबळ जागतिक विजेती

जॉर्जियामधील बटुमी येथे पार पडलेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने अभूतपूर्व कामगिरी करत अंतिम फेरीत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केलं आणि भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे. दिव्या देशमुखने वयाच्या केवळ १९व्या वर्षी हे यश संपादन करून भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे दिव्या भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. दिव्याने भारताची 88 वी ग्रँडमास्टर होण्याचा मानही मिळवला.

या स्पर्धेच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींपैकी एक म्हणजे अंतिम फेरीत दोन भारतीय महिला खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. कोनेरू हम्पीच्या अनुभवासमोर दिव्याच्या धाडसी निर्णयक्षमता आणि सखोल तयारीचा विजय झाला. यामधून भारताच्या बुद्धिबळ क्षमतेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस प्रदर्शन झालं आणि चीनसारख्या बलाढ्य बुद्धिबळ राष्ट्रांवर मात करण्यात भारत यशस्वी झाला.

FIDE महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीतील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे 42 लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे 30 लाख रुपये बक्षिसे मिळतील. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली आहे.

बुद्धिबळ तज्ञांनी दिव्याच्या विजयाचे विशेष कौतुक केले असून विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या दिग्गजांनी तिच्या खेळातील परिपक्वता आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. या यशामुळे देशभरात नवोदित बुद्धिबळपटूंना प्रेरणा मिळेल आणि महिलांच्या सहभागास नवे दालन खुले होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *