जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

अमेरिकेत केवळ 21 आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर जन्मलेल्या एका चिमुकल्याने जन्मतःच विक्रम प्रस्थापित केला आहे.नॅश कीन असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा जन्म 5 जुलै 2024 रोजी अमेरिकेतील आयोवा सिटी, आयोवा येथे झाला. जन्मावेळी त्याचे वजन फक्त 10 औंस (10 ounces) होते आणि तो त्याच्या नियोजित जन्मतारखेपेक्षा 133 दिवस किंवा सुमारे 19 आठवडे लवकर जन्माला आला होता. नॅशने या या महिन्याच्या सुरुवातीला आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर, त्याला अधिकृतपणे सर्वात अकाली जन्मलेल्या बाळाचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा (GWR) पुरस्कार मिळाला. त्याने 2020 मध्ये अलबामामध्ये जन्मलेल्या मागील विक्रमधारकाला फक्त एका दिवसाने मागे टाकले.