राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

कोल्हापूर दि २६– कोल्हापुरातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत. शुक्रवारी रात्री ३,४,५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे उघडले आहेत. स्वयंचलित दरवाज्यातून ४२८४ क्युसेक आणि पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक असा एकूण ५७८४ क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. नदी काठच्या गावांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.