श्रावण महोत्सवाची भव्य पाककला स्पर्धा

 श्रावण महोत्सवाची भव्य पाककला स्पर्धा

मुंबई, दि. 25 : आजपासून सुरू होत असलेला श्रावण महिना म्हणजे सणवार आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल. या निमित्ताने मिती ग्रुपद्वारे श्रावण महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचं हे अकरावं वर्ष असून, राज्यभरातील महिलांना आपल्या पाककलेचं प्रदर्शन करण्यासाठी आणि विविध बक्षिसं जिंकण्यासाठी एक जबरदस्त संधी देणारी ही भव्य पाककला स्पर्धा ठरणार आहे. यंदा ही स्पर्धा एक-दोन नव्हे, तर तब्बल अकरा शहरांमध्ये पार पडणार आहे.

स्पर्धेची सुरुवात ठाणे येथून २५ जुलै रोजी होणार असून, २६ जुलैला दादर आणि २७ जुलैला गोरेगाव येथे प्राथमिक फे-या पार पडणार आहेत. त्यानंतर पालघर, पनवेल, डोंबिवली, वसई, नाशिक, कांदिवली, गिरगाव आणि पुणे या शहरांमध्येही या फे-या क्रमशः पार पडणार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेळ असून, स्थानिक स्पर्धकांना आपापल्या शहरात सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेमध्ये प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून, इच्छुकांनी नाव नोंदवण्यासाठी ९९३०११५७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे केवळ पाककलेची स्पर्धा नव्हे, तर त्यासोबतच लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा, मजेशीर गेम्स आणि आकर्षक बक्षिसांची भरभरून उधळण येथे असणार आहे. प्रत्येक प्राथमिक फेरीतून पाच स्पर्धकांची महाअंतिम फेरीसाठी निवड होणार असून, त्यांनाही खास गिफ्ट हॅम्पर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, महाअंतिम फेरीत पहिल्या तीन क्रमांकाने विजेते ठरणाऱ्या स्पर्धकांना सुंदर पैठणीची भेट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, सर्वात मोठं आकर्षण म्हणजे महोत्सवातील पहिल्या दोन विजेत्यांना थेट दुबई आणि थायलंडची टूर जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

‘श्रावण महोत्सव २०२५’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महिलांना एक व्यासपीठ देणारा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना उजाळा देणारा, आणि एक दिवस भरपूर आनंद देणारा महोत्सव आहे. त्यामुळे प्रत्येक शहरातील महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्वतःच्या पाककलेचं कौतुक करून घ्यावं आणि बहारदार भेटवस्तूंचा लाभ घ्यावा. असं आवाहन मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक उत्तरा मोने यांनी केलं आहे.

स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला एक खास बक्षीसही दिलं जाणार आहे. यासोबतच, प्रत्येक ठिकाणी विविध उत्पादनांचे स्टॉल्सही लावण्यात येणार असून, ग्राहकांना तिथे सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे. त्यामुळे एक दिवस मजेत घालवण्याची, खेळ, स्पर्धा, बक्षिसं आणि पाककलेचा आनंद लुटण्याची ही एक अनमोल संधी आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *