पुणे मेट्रोचा ‘वन पुणे विद्यार्थी पास’ आता मोफत…

 पुणे मेट्रोचा ‘वन पुणे विद्यार्थी पास’ आता मोफत…

पुणे दि २४– पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्ष्या जास्त असून त्यात निरंतर वृद्धी दिसत आहे. या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा वाटा विद्यार्थी समुहाचा आहे.

शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रो एक खास भेट घेऊन आली आहे. दिनांक २५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत, पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’ (KYC)’ पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ११८ रुपयांना (रु १०० + रु १८ – GST) मिळणारे विद्यार्थी पास कार्ड आता या कालावधीत पूर्णपणे मोफत मिळणार आहे. पण हे कार्ड घेताना सोबत किमान २०० रुपयांचा टॉप-अप करणे अनिवार्य असणार आहे. या २०० रुपयांचा कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे २०० रुपये टॉप-अप मिळणार असून त्यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या विशेष उपक्रमात ‘विद्यार्थी पास कार्ड’ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान दररोज सर्व प्रवासावर ३० % सवलत उपलब्ध असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक समाविष्ट आणि सहाय्यक वातावरण निर्माण होईल.

याप्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी म्हटले आहे की, “विद्यार्थी मोठ्या संख्येने मेट्रोचा वापर करताना दिसत आहेत. आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. या काळात सर्व विद्यार्थ्यांनी मेट्रोचा पास घ्यावा, यासाठी ही विशेष सवलत योजना मेट्रोने आणली आहे. मेट्रो मार्गांवरील सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांनी व तेथील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.”

ऑफरचे तपशील खालीलप्रमाणे:

ऑफर कालावधी: २५.०७.२०२५ ते १५.०९.२०२५
पात्रता: पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी (KYC पडताळणीसह) १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यर्थ्यांना त्यांच्या पालकांच्या नावावर हे कार्ड घेत येणार आहे. (पालकांच्या KYC पडताळणीसह)
कार्ड मूल्य: ₹०/- (मोफत)
किमान टॉप-अप मूल्य: ₹२००/-

सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे मेट्रो करत आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *