कॅन्सरवरील उपचारांमध्ये एक महत्त्वाकांक्षी विजय

मुंबई, दि २४ : भारतात विकसित करण्यात आलेल्या सीएआर टी-सेल थेरपीने दोन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार झाले असल्याने जागतिक स्तरावरील हे यश ही एक अभूतपूर्व आहे असे अपोलो हॉस्पिटल चे डॉ.पुनीत जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अपोलो हॉस्पिटल्स ने ८५ बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रियांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. ओडिशाच्या ४९ वर्षीय शर्मा बी-सेल अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया नावाच्या हट्टी रक्त कॅन्सरशी झुंज देत होत्या त्यांना बरे केले. मुंबईचे रहिवासी, ५७ वर्षांचे दास यांना फॉलिक्युलर लिम्फोमा झाला होता. हा एक प्रकारचा रक्त कॅन्सर आहे, ज्याने केमोथेरपी आणि रेडिएशनसह अनेक उपचारानंतर पुन्हा डोके वर काढले होते. त्यांनाही बरे असे अरुणेश पुनेथा यांनी सांगितले.
भारतात प्रगत कॅन्सर देखभाल प्रदान करण्याच्या आमच्या बांधिलकीचे एक उदाहरण आहे. अपोलो समूहातील इतर अनेक हॉस्पिटल्समध्ये देखील सीएआर टी-सेल प्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. रुग्णांना सर्वोच्च दर्जाची देखभाल प्रदान करण्याच्या आमच्या क्षमता यामध्ये दर्शविल्या गेल्या आहेत. KK/ML/MS