महाड एमआयडीसी पोलिसांनी केले ₹88.92 कोटी केटामाईन जप्त!

महाड दि २४–
महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स कंपनीच्या महाड औद्योगिक वसाहत ठाण्याचे पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹88.92 कोटी किंमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई झाली असली तरी अजूनही काही कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये चर्चिली जात आहे.
महाड औद्योगिक वसाहतीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एमआयडीसीतील प्लॉट नंबर.E.२६/३ या प्लॉटमध्ये रोहन केमिकल कंपनी कार्यरत असून कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला.
या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, याप्रकरणी मच्छिंद्र भोसले राहणार जिते तालुका महाड, सुशांत पाटील राहणार मोहप्रे तालुका महाड, शुभम सुतार राहणार . पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ,व रोहन गवस राहणार ५०१ मार्बल आर्च मित्तल कॉलेज जवळ चिंचोली बंदर मालाड वेस्ट मुंबई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत८(c) २२(c) २५,२७,(a) २९,४२ बी एन एस २०२३ चे कलम३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे. ML/ML/MS