माजी आमदार यामिनी जाधव यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मुंबई, दि २३
शिवसेनेच्या भायखळा विधानसभेच्या माजी आमदार यांमीनी जाधव यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या माजगाव येथील राहत्या घरी जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भायखळा विधानसभेतील तसेच दक्षिण मुंबईतील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आम्ही नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो मध्ये मी आजारी होती त्यामुळे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकली नाही परंतु आता मी पुन्हा सक्रिय झाली असुन आपल्या कोणत्याही समस्या असतील त्या मला सांगाव्या त्या मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. या कार्यक्रमात सुरेल गाण्यांनी उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले.KK/ML/MS