ऊर्दू शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा

मुंबई, दि २३
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री गजाननजी नागे” यांनी मोफत वह्या वाटपाचा व खाऊ वाटप कार्यक्रम मिरा भाईंदर महानगरपालिका उर्दू शाळा क्रं-३२ मिरागाव, काशीमीरा, मिरा रोड, ठाणे. येथे आयोजित केला होता.
*शुद्ध विचाराने प्रेरित होऊन, हाच हेतू मनाशी बांधून समाजातील धार्मिक तेढ दूर व्हावी ही संकल्पना घेऊन, एक पुढचं पाऊल म्हणून गजानन नागे नी उचललं होतं
*”हिंदूत्व” म्हणजेच ‘सहिष्णुता’ आणि ‘सर्वधर्म समभाव’ आचरणात आणून समाजामध्ये सर्व समावेशक वातावरण निर्माण व्हावं आणि एका चांगल्या वातावरणाची निर्मिती व्हावी. हा विचारच आपल्या धर्माचा गाभा तो धर्म नव्हे तर एक संस्कृती आहे.हिच आपल्या प्राचीन सनातन संस्कृतीच्या जीवनाची यशस्वी वाटचाल याच संस्कृतीची बीजं घेऊन, उर्दू शाळेतील मुस्लिम लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा वह्या व खाऊ स्वीकारताना आनंद द्विगुणीत झालेला पाहिला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा ते हास्य आणि तो आनंद पाहून अक्षरशः तिथले शिक्षकवृंद आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर नगरसेवक मोहन म्हात्रे, सुरेखा सोनार आणि सामाजिक कार्यकर्ते सलिम शाहा, मंदार पाटील व प्रदिप बिरमोळे,समाजसेवक यांच्या डोळ्याचे पारणे फिटेले होते. डोळे आनंद अश्रुंनी भरून आले होते. लहान मुलांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना शत आयुष्य, देशसेवेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या मुलींनी हात उंचावून अल्ला कडे प्रार्थना केली
आजचा दिवस अक्षरश: आमच्या सर्वांच्या आयुष्यात एक सुवर्ण पान घेऊन आला होता
*असा दिन सोनियाचा आम्ही जनी मनी पाहिला ऊर्दू शाळेत 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी विदर्भ वैभव मंदिर मुंबई या संस्थेने सहकार्य करुन सामाजिक बांधिलकी जपली.KK/ML/MS