दक्षिण गडचिरोली जलमय! अहेरी-आलापल्लीचा संपर्क तुटला…

 दक्षिण गडचिरोली जलमय! अहेरी-आलापल्लीचा संपर्क तुटला…

गडचिरोली दि २३:– गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र दक्षिण गडचिरोलीत पाऊसाचा मोठा फटका बसला आहे.(अहेरी उपविभागात) सकाळी ११.१५ वाजता दरम्यान मुसळधार पावसाचा अचानकपणे जोर वाढला . तब्बल चार तास सारखा मुसळधार पाऊस झाल्याने अहेरी आलापल्ली परिसर जलमय झाला.

अहेरी-आलापल्ली मार्गावरील लक्ष्मी नाल्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने दोन्ही शहरांचा संपर्क ग्रामीण भागाशी तुटला आहे. परिणामी, चाकरमानी, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक सेवेच्या वाहनांसाठीही मार्ग अडथळाग्रस्त झाला आहे.

शहरांतर्गत रस्त्यांवर खड्डे, अर्धवट ड्रेनेज कामे आणि निकृष्ट जलनिस्सारणामुळे पाणी तुंबून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक पुराचे पाणी नाल्यावरवाहत आसाल्याने मार्ग बंद झाले. तर दुसरीकडे काही भागांत जलमय परिस्थिती निर्माण झाली असून अपघाताचे संभाव्य धोके निर्माण झाले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत ‘अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका’ असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने केले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती, आपत्कालीन मदत, आणि गरजूंना तत्काळ सहाय्य मिळावे यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *