लिंबे वडगाव येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो, छातीभर पाण्यातून प्रवास…

जालना दि २३:– मुसळधार पावसामुळे जालन्याच्या लिंबे वडगाव येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झालाय. या तलावाचे पाणी गावातील रस्त्यांवरून वाहू लागल्याने नागरिकांना छातीपर्यंतच्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी कसरत होत असल्याचं चित्र दिसून येतंय.
जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यांत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून साठवण तलावही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव ते मंठा रस्त्यावर असलेला पाटोदा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दरम्यान, छातीपर्यंत पाण्यातून प्रवास करत असलेल्या नागरिकांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ML/ML/MS