संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा

सोलापूर दि २३:- संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत नामदेव पायरीची विधिवत पूजा आणि महाआरती झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल दर्शन देखील घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , संत नामदेव महाराज यांचे वंशज असणारा नामदास परिवार उपस्थित होता.
प्रसंगी संत नामदेव महाराज भक्तांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. वैश्विक एकात्मता टिकवण्याचे काम संत नामदेव महाराज यांनी केले. त्यामुळे पंढरपुरात नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभे केले जाणार आहे. नामदेव महाराजांचे खरे स्मारक त्यांच्या विचारात असून. नामदेव महाराजांचे विचार आणि साहित्य राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक समरसता आणि एकात्मता टिकवण्याचे काम संत नामदेवांनी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्यापूर्वीच भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करून केले असल्याचे प्रतिपादन यावेळी फडणवीस यांनी केले. ML/ML/MS