मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुंबै बँकेसह मजूर फेडरेशनतर्फे ११.७३ लाखांचा धनादेश

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई जिल्हा सहकारी बँक, मजूर फेडरेशन व विभागीय मजूर फेडरेशन यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख ७३ हजार २२२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. दरेकरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या जाहिराती, होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता, वृत्तपत्र किंवा टिव्हीवर जाहिराती न देता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी, सेवा, मदत आणि समाजहिताची भावना जोपासा, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई बँक, मजूर फेडरेशन व विभागीय मजूर फेडरेशनने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ११ लाख ७३ हजार २२२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सढळ हस्ते सुपूर्त केला. याप्रसंगी भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर, बँकेचे संचालक आनंदराव गोळे, मजूर फेडरेशन व विभागीय फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. KK/ML/MS