संत ज्ञानेश्वर महाराज्यांची पालखी पुन्हा आळंदीत दाखल….

पुणे दि २०– संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी ३१ दिवसांचा भाविकांनी ओथंबलेला, भक्तिमय प्रवास पूर्ण करून आज पुन्हा आळंदी नगरीत पोहोचली आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, कोट्यवधी भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ च्या जयघोषात हे वारीचं वैभव संपन्न झालं. आळंदीत पुन्हा पालखी पोहोचल्यावर महापूजा, हरिपाठ, कीर्तन, भजन अशा विविध भक्तिपर कार्यक्रमांनी सोहळ्याचा समारोप झाला. नगरप्रदक्षिणा करून माउलींची पालखी समाधी मंदिरात पोहोचली. ML/ML/MS