मुख्यमंत्रांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महारक्तदान शिबीर

 मुख्यमंत्रांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महारक्तदान शिबीर

मुंबई दि १९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलै रोजी प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. भाजपा परिवारातील सर्वांनी या महारक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांनी या पत्रकात म्हटले आहे की, 19 जुलैपर्यंत प्रत्येक रक्तदात्याचा फॉर्म भरून घ्यायचा असून प्रत्येक मंडलात किमान 100 रक्तदात्यांचे लक्ष्य जिल्हाध्यक्षांनी पूर्ण करायचे आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *