Scale AI मधील ७०० कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी गमावली नोकरी

AI च्या आगमनामुळे अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याचा अंदाज आता खरा ठरत आहे. स्केल एआय या वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनीने आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. त्यामुळे ही कपात टेक उद्योगात खळबळ माजवणारी ठरली आहे. मेटाकडून 14 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 1.16 लाख कोटी रुपये इतका प्रचंड निधी मिळाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच स्केल एआयने 200 पूर्णवेळ कर्मचारी आणि 500 कंत्राटी कामगारांना काढून टाकलं आहे.
स्केल एआय या वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनीने आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. त्यामुळे ही कपात टेक उद्योगात खळबळ माजवणारी ठरली आहे. मेटाकडून 14 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 1.16 लाख कोटी रुपये इतका प्रचंड निधी मिळाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच स्केल एआयने 200 पूर्णवेळ कर्मचारी आणि 500 कंत्राटी कामगारांना काढून टाकलं आहे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीनंतर अशी कारवाई होईल, याची कोणालाच अपेक्षा नव्हती.
कपातीचा थेट परिणाम जनरेटिव्ह एआय टीमवरही कपात विशेषतः स्केल एआयच्या जनरेटिव्ह एआय (जेनएआय) विभागावर झालाय. जो गुगलच्या जेमिनी आणि एलोन मस्कच्या एक्सएआयच्या ग्रोक चॅटबॉटसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत होता. स्केल एआयचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेसन ड्रोगे यांनी कर्मचाऱ्यांना एका अंतर्गत ईमेलद्वारे ही माहिती दिली. जी नंतर बिझनेस इनसाइडरने उघड केली. या ईमेलनुसार कपात ही कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग आहे. पण यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि अनिश्चितता पसरली आहे.
SL/ML/SL