Airtel च्या ग्राहकांना Perplexity Pro’ चे १७ हजारांचे सबस्क्रीप्शन मोफत

मुंबई, दि. १८ : देशातील आघाडीचे नेटवर्क भारती एअरटेलने आपल्या पात्र ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. आता एअरटेल ग्राहक तब्बल17 हजार रुपये किमतीचे ‘Perplexity Pro’ सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळवू शकतात. सध्या चॅटजीपीटी आणि जेमिनी सारखे एआय चॅटबॉट्स लोकप्रिय झाले आहेत. पर्प्लेक्सिटी हे एक एआय-चालित सर्च इंजिन आहे. हे तुम्हाला इंटरनेटवरून माहिती गोळा करून कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देते.
Perplexity हे जीपीटी-4.1 आणि क्लॉड 4.0 सोनट यांसारख्या अत्याधुनिक भाषा मॉडेल्सचा वापर करून अचूक आणि स्पष्ट उत्तरे देते, असे कंपनीने म्हटले आहे. Perplexity Pro सह यूजर्स गूगल, ओपनएआय आणि अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांच्या लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये सहज स्विच करू शकतात आणि त्यांना जे सर्वोत्तम वाटते ते वापरू शकतात.
‘पर्प्लेक्सिटी प्रो’ सबस्क्रिप्शनमध्ये मिळतील हे फायदे
300 एआय-आधारित रिसर्ज: रिसर्च एका दिवसात 300 पर्यंत एआय-आधारित सर्च करू शकतात.
फाइल विश्लेषण: फाइल्स अपलोड करून त्यांचे विश्लेषण आणि सारांश तयार करण्याची सुविधा.
टेक्स्ट-टू-इमेज जनरेटर: डाल-ई सारख्या मॉडेल्सद्वारे चालणारा टेक्स्ट-टू-इमेज जनरेटर देखील यात समाविष्ट आहे.
लॅब्स फिचर: नुकतेच जोडलेले ‘लॅब्स’ फिचर यूजर डीप वेब ब्राउझिंग, कोड एक्झिक्यूशन, चार्ट आणि इमेज क्रिएशन यांसारख्या साधनांचा वापर करून स्प्रेडशीट्स, वेब ॲप्स आणि डॅशबोर्ड्स तयार करण्यास मदत करते.
मोफत Perplexity Pro सबस्क्रिप्शन कसे मिळवाल?
तुमचे एअरटेल थँक्स ॲप उघडा.
ॲपमध्ये ‘रिवॉर्ड्स’ विभागात जा.
तेथे तुम्हाला “₹17,000 किमतीचे 12 महिन्यांचे Perplexity Pro मोफत मिळवा” असे लिहिलेले बॅनर दिसेल, त्यावर टॅप करा.
पुढील स्क्रीनवर ‘क्लेम नाऊ’ बटणावर क्लिक करा.
त्यानंतर Perplexity च्या वेबसाइटवर साइन-अप किंवा साइन-इन प्रक्रिया पूर्ण करा.
हे एक कॉम्प्लिमेंटरी सबस्क्रिप्शन असल्याने, तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही पेमेंटची माहिती देण्याची आवश्यकता नाही.
SL/ML/SL