मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद ….

मुंबई दि १८– सर्वंकष प्रगतिशील महाराष्ट्र बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे, मुंबई महानगराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या असंख्य योजना राबविण्यात येत आहेत,मुंबई महाराष्ट्रापासून पुढील हजारो वर्षे कोणीही तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी सभागृहात आरोप करताना नीट पुरावे द्यावेत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा मात्र चर्चेत कोणतेही पुरावे न देता नुसतेच आरोप करण्यात आले असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
विधिमंडळात घडलेल्या ताज्या घटनांमुळे चर्चेतून आणि विचारातून जनतेमध्ये संदेश जाण्यापेक्षा लाथा बुक्क्यांचा संदेश गेला. अध्यक्षांविरोधात झालेले माध्यमांसमोरील थेट आरोप हे काय दर्शवितात याचा गांभीर्याने विचार करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले, कालच्या घटनेतील दोन्ही व्यक्तींवर अनेक गुन्हे दाखल आहेत, विधिमंडळाची सुरक्षा यंत्रणा अधिक कडक आणि सुसज्ज करून प्रवेश देण्यात यावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
हिंदी भाषा सक्ती नाहीच, हनी ट्रॅप नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, जनसुरक्षा कायदा केवळ माओवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी कोणत्याही आंदोलना विरोधी नाही. राज्यात आजवर ३८,८०२ पोलिसांची नव्याने भरती करण्यात आली आहे, आणखी १३,५६० पोलिसांची भरती करण्यात येत आहे. सौर कृषी पंप योजनेमुळे दहा हजार कोटींची बचत, साडे पाच कोटींची सबसिडीची बचत होऊन २५ टक्के कार्बन उत्सर्जित होणे बचत होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुंबई महानगरात चालणाऱ्या लोकल ट्रेनमधील अपघात लक्षात घेऊन यापुढे संपूर्ण दरवाजे बंद राहणाऱ्या नवीन एसी लोकल गाड्या , भाड्यात कोणतीही वाढ न करता सुरू करण्यात येणार आहेत, रेल्वे मंत्री लवकरच त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करतील . धारावीत कोणीही विस्थापित होणार नाही, पुढील सात वर्षात धारावीतील पात्र रहिवाशांना आहे तिथेच घरे मिळतील , तिथल्या व्यावसायिकांना धारावीतच
व्यावसायिक गाळे मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. अपात्र रहिवाशांना मुंबईत इतरत्र घरे मिळतील असं ही मुख्यमंत्री आपल्या उत्तरात म्हणाले. ML/ML/MS