मुंबईत दीड कोटींचे शौचालय, विधानसभा अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

मुंबई दि १७– मुंबईतील फोर्ट भागात असणाऱ्या गॉथीक शैलीतील हेरिटेज बांधकामांचे सौंदर्य बिघडविणाऱ्या आणि पदपथावर बांधण्यात येत असलेल्या दिड कोटी रुपयांच्या आधुनिक शौचालयांच्या कामाला स्थगिती देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली, तर याप्रकरणी तीस दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्यात यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
याबाबतची लक्षवेधी सूचना अमित साटम यांनी उपस्थित केली होती, त्यावर वरुण सरदेसाई, अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न विचारले, मंत्री आशिष शेलार यांनी देखील यावर आश्चर्य व्यक्त केलं.

पदपथ लोकांना चालायला असून त्यावर शौचालय कसे बांधले जात आहे, कोणत्या अधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली, त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी असे निर्देश अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात दिले. प्रत्येकी एक कोटी पासष्ट लाख रुपयांचे हे शौचालय असून त्याच्या बांधकामाला लगेच स्थगिती देण्यात येईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली. ML/ML/MS