सिडकोचे अधिकारी ऐकत नाहीत, आमदारांनी दिली राजीनाम्याची धमकी

मुंबई दि १७– पुढील दोन महिन्यात नवी मुंबईत सिडकोच्या ताब्यातील पाणी पुरवठा योजना स्वयंचलित तंत्रज्ञान पद्धतीवर नेण्यासाठी निविदा काढण्यात याव्यात अशी सूचना सिडको प्रशासनाला करण्यात येतील अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली.याप्रकरणी असंख्य वेळा मागणी करूनही कारवाई केली जात नाही आता राजीनामे देतो अशी संतप्त भावना प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करताना व्यक्त केल्या.

सिडकोचे अधिकारी निबर झाले आहेत, लोकांना पाणी मिळत नाही, आमदारांनी वारंवार तक्रारी करूनही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, त्यामुळे आम्ही राजीनामे द्यावे का असा सवाल त्यांनी यावेळी केला होता. या भागातील रहिवासी संतप्त आहेत , आम्ही आमदार म्हणून आमच्याकडे ते तक्रारी करतात, आम्ही याप्रकरणी अधिकाऱ्यांना भेटून सांगूनही ते दुर्लक्ष करतात आता आम्ही राजीनामे देतो असे ठाकूर म्हणाले . त्यावर पुढील दोन महिन्यात स्वयंचलित यंत्रणा उभी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध न केल्यास सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देखील सामंत यांनी यावेळी दिली. ML/ML/MS