वडा पाव, समोसा, जलेबी विकताना लावाला लागेल Health Alert फलक

 वडा पाव, समोसा, जलेबी विकताना लावाला लागेल Health Alert फलक

नवी दिल्ली, दि. १४ : भारतातील वाढत्या लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता, समोसा, जलेबी, लाडू आणि वडा पाव यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये किती साखर आणि कॅलरीज आहेत याची माहिती ‘तेल आणि साखर इशारा’ फलकाद्वारे द्यावी लागेल. मात्र सध्या हा नियम फक्त एम्स आणि आयआयटी सारख्या केंद्रीय संस्थांच्या कॅन्टीनवर आणि इतर संस्थांवर लागू असेल.

तेल आणि साखरेचे इशारा फलक’ केंद्रीय संस्थेच्या कॅन्टीन आणि सार्वजनिक ठिकाणी लावले जातील. या बोर्डांवर समोसा, जलेबी, पकोडा, लाडू यांसारख्या स्नॅक्समध्ये किती तेल आणि साखर असते याची माहिती दिली जाईल. उदाहरणार्थ, एका गुलाब जामुनमध्ये पाच चमचे साखर असते हे सांगता येईल. जंक फूडच्या आरोग्य धोक्यांबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूर सारख्या सर्व केंद्रीय संस्थांना हे बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. हे बोर्ड कॅन्टीन, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी दिसतील. दिल्लीतही जंक फूडवर सिगारेटसारखे इशारे लावण्याची तयारी सुरू आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *