MHADA कोकण मंडळाकडून 5,285 घरांसाठी लॉटरी

 MHADA कोकण मंडळाकडून 5,285 घरांसाठी लॉटरी

मुंबई, दि. १४ : म्हाडा कोकण मंडळाकडून ५ हजार २८५ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. विविध योजने अंतर्गत ही लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीमध्ये ७७ भूखंड असून तब्बल ५ हजार २८५ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे शहर आणि जिल्हा, तसेच वसईतील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गतच्या सदनिका आणि सिंधुदुर्गातील ओरोस तसेच कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. कोकण विभागाकडून जाहीर केलेली सोडत पाच घटकांत विभागली गेली आहे. २० टक्के सर्वसमावेश योजनेअंतर्गत ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजने अंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १,६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्‍या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख : १४ जुलै २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ पर्यंत
अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२५, रात्री ११.५९ पर्यंत
पात्र लोकांची पहिली यादी: २१ ऑगस्ट २०२५, सायंकाळी ६.०० वाजता
दावे आणि हरकती सादर करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२५, सायंकाळी ६.०० वाजता
अंतिम पात्र लोकांची यादी: १ सप्टेंबर २०२५, सायंकाळी ६.०० वाजता
अर्जाची सोडत : ३ सप्टेंबर २०२५, सकाळी १० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह

Lottery for 5,285 houses from MHADA Konkan Board

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *