सरकारने केलेल्या अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात आज ठाण्यात पुकारले बंद

ठाणे :आज खवय्या आणि मद्यपींना या बंदचा फटका बसला आहे
सरकारने परवाना शुल्क 15 टक्के वाढविले आहे तर उत्पादन शुल्क 60 टक्के ने वाढविले आहे.
या सरकारच्या निर्णया विरोधात हॉटेल बंद आंदोलन आज करण्यात आले.

राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॅारेन्ट मालकांनी राज्य सरकार च्या करवाढी विरोधात आज बंद ची हाक दिली होती.ठाण्यातील हॅाटेल असोसियशन कडून राज्य सरकार च्या कर वाढी विरोधात घोषणाबाजी करुन या करवाढीचा निषेध हॅाटेल मालकांनी आज केला आहे.आपण जर करवाढ करत असाल तर आम्ही परवाने सरकारकडे जमा करु असा इशारा आज हॅाटेल चालक मालकांनी दिला आहे.
ह्या विषयी ठाणे हॉटेल असोसिएशन चे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.AG/ML/MS