कांदळवने नष्ट करणाऱ्या विकासकांवर कारवाई…

मुंबई दि १४ — राज्यातील कांदळवने नष्ट करून इमारती बांधणाऱ्या विकासकांच्या कामांना स्थगिती देण्यात येईल आणि त्यांच्या परवानग्या तपासण्यात येतील अशी ग्वाही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना भास्कर जाधव यांनी उपस्थित केली होती, त्यावर संजय केळकर यांनी उपप्रश्न विचारले.

ठाण्यातील रुस्तमजी आर्बेनिया येथे कांदळवन नष्ट करून इमारती उभारण्यात आल्याच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सागरी किनारा नियंत्रण प्राधिकरणाला २०२३ साली तपासणी करून अहवाल सादर करण्यास केंद्राकडून कळविण्यात आलं होतं मात्र त्यांनी दोन वर्षे त्यावर काहीच कारवाई केली नाही, यासाठी जबाबदार अधिकारी , पालिका अधिकारी यांची उच्च स्तरीय चौकशी तीन महिन्यात करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देखील मंत्री नाईक यांनी दिली. याशिवाय असे बांधकाम करणाऱ्या विकासकाला कठोर दंड ठोठावण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.ML/ML/MS