कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

 कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

पुणे प्रतिनिधी, दि. १२ : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य  प्रसेनजित फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संदीप कदम, संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमण , संचालक प्रा. प्रशांत कसबे आणि अंकित लुनावत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्राचार्य डॉ. कदम सरांनी विद्यार्थ्यांना गुरुदक्षिणा म्हणून मोबाईलचा कमी वापर आणि १०० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कीस्टोन परिवारातर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल १० प्राध्यापकांचा ‘विद्या विभूषण पुरस्कार’ देऊन शाल आणि सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. शर्वरी कुलकर्णी, प्रा. सागर राजेभोसले, प्रा. विपुल महिंद्रकर, डॉ. सोनाली शिर्के, प्रा. जयश्री पवार, प्रा. सुवर्णा फुले, प्रा. रूपाली नाळे, प्रा. पूनम नझीरकर, प्रा. स्वाती पानेरी आणि प्रा. शीतल माने यांचा समावेश होता. संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी स्नेहा भोसले आणि अनुष्का पाटील या दोघींनी अंतिम वर्षात दोन्ही सेमिस्टरमध्ये १० SGPA मिळवलेबद्दल त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ग्रीटिंग कार्ड मेकिंग स्पर्धेत एकूण ८७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात अदनान शेख (१ला), किर्ती कदम (२रा) आणि नक्षत्रा चासकर (३रा) यांनी क्रमशः पारितोषिके मिळवली. चारोळी लेखन स्पर्धेत ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात उर्मिला सुर्वे (१ली), कल्याणी खोडके (२री) आणि इंगवले गुरुराज (३रा) हे विजेते ठरले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसेनजित फडणवीस  यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल ‘शिक्षा भास्कर पुरस्कार’, पुणेरी पगडी आणि सन्मानपत्र देऊन कीस्टोन परिवाराने गौरविले. आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे फडणवीस यांनी कीस्टोन परिवार आणि सोमण  सर यांचे आभार मानले आणि हा सन्मान त्यांच्या जीवनातील गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग व शिक्षण क्षेत्रातील नव्या आव्हानांची माहिती दिली आणि उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थापक संचालक प्रा. सोमण  सरांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेचे महत्व सांगत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अँकर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले. संयोजन प्रा. सुवर्णा फुले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या कार्यक्रमात १००० पेक्षा अधिक विद्यार्थी, विभागप्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *