पंतप्रधान मोदींचे व्यंगचित्र काढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

इंदौर, दि. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर व्यगचित्र काढणारे इंदौर येथील व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांच्या जामिनावार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हेमंत मालवीय यांनी२०२१ मध्ये कोविड (Covid) दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्र काढले होते. त्यावर संघाच्या एका स्वयंसेवकाने तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा जामीन अर्ज मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची सुनावणी करण्याचे ठरवले असून येत्या १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मालवीय यांनी काढलेले व्यंगचित्र संघाचे स्वयंसेवक विनय जोशी यांनी हेमंत मालवीय यांच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन हे व्यंगचित्र पाहिले होते व त्या विरोधात तक्रार केली होती. मालवीय यांच्याकडून उच्च न्यायालयात अशी बाजू मांडली होती की, हे व्यंगचित्र केवळ गंमत म्हणून फेसबुकवर शेयर करण्यात आले होते. त्यांचा जामीन अर्ज फेटाळताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले होते की, हे व्यंगचित्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या सीमा ओलांडणारे असून त्यावर आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. मालवीय यांच्या विरोधात बाबा रामदेव यांनीही तक्रार केली होती.
SL/ML/SL