जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घेताहेत जपानी,जर्मन भाषेचे धडे

 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घेताहेत जपानी,जर्मन भाषेचे धडे

नाशिक, दि. ११ : एकीकडे खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत असताना नाशिकमधील अंदरसुलची शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल इथली जिल्हा परिषद शाळेतील मुली चक्क जपानी आणि जर्मन भाषेतून बोलतात. राज्यात हिंदीभाषेवरुन रान पेटलंय.. असं असताना जागतिक स्पर्धेत आपले विद्यार्थी पुढे जावेत यासाठी अंदरसुलच्या शाळेतील शिक्षकांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदीसोबतच मुलांना जपानी आणि जर्मन भाषाही शिकवण्यास सुरुवात केली आहे. इथल्या मुली आलेल्या प्रत्येकाचं स्वागत जपानी आणि जर्मन भाषेत करतात.

विशेष म्हणजे, शाळेतील मुली पाहुण्यांचे स्वागत जपानी आणि जर्मन भाषेत करतात, ज्यामुळे शाळेचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची आत्मविश्वासपूर्ण उपस्थिती अधोरेखित होते. या उपक्रमाचे कौतुक मंत्री छगन भुजबळ यांनीही केले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यासह कोडिंग आणि अ‍ॅप डेव्हलपमेंट सादरीकरणाचेही अभिनंदन केले. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनीने २७ अंकी आकड्यांचे वाचन करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. ही शाळा ग्रामीण भागात असूनही आधुनिक शिक्षणाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी, विदेशी शिक्षण, आणि नवीन करिअर पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वाढते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *