मुंबईत लवकरच सुरु होणार Tesla चे शोरुम

मुंबईमध्ये टेस्लाचा पहिला शोरूम १५ जुलै रोजी सुरू होणार आहे आणि हे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हे शोरूम मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील मेकर मॅक्सिटी इमारतीत असणार असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ४,००३ चौरस फूट आहे. या अनुभव केंद्रात टेस्लाच्या मॉडेल Y SUV गाड्या प्रदर्शित करण्यात येणार असून त्या चीन आणि अमेरिका येथून आयात करण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात टेस्ला भारतात ऑर्डर घेण्यास सुरुवात करणार असून ऑगस्ट अखेरीस वितरित गाड्या ग्राहकांपर्यंत पोहोचतील.
आयात शुल्क जवळपास ७०% असल्यामुळे मॉडेल Y ची किंमत ₹६० लाखांहून अधिक असू शकते. त्यासोबतच टेस्लाने सुपरचार्जर्स आणि इतर उपकरणेही भारतात आणली आहेत जेणेकरून ग्राहकांना सुविधा मिळू शकेल. यासोबतच, याच महिन्यात नवी दिल्लीत दुसरे शोरूम उघडले जाणार आहे, ज्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात टेस्लाची उपस्थिती अधिक ठळक होणार आहे.
SL/ML/SL