बेकायदेशीर खनिजांच्या उत्खननासाठी मेघा इंजिनिअरिंगला ९४.६८ कोटी रु दंड

मुंबई: (११ जुलै) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत माहिती दिली की रस्ते बांधकामादरम्यान गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननासाठी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला ९४.६८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका प्रकरणात दंडाच्या १ टक्के रक्कम जमा केल्यानंतर कंपनीची जप्त केलेली मशिनरी अपिलांच्या सुनावणीपर्यंत सोडण्यात आली, असे ते म्हणाले प्रतिस्पर्धी बोलीदार एल अँड टीने सर्वोच्च न्यायालयात निविदा प्रक्रियेला आव्हान दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यांना दिलेला कंत्राट रद्द केल्याने हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर अलीकडेच चर्चेत आले.
SL/ML/SL