चर्मोद्योग महामंडळाचे संपूर्ण कर्ज माफ करा,
चर्मोद्योग एक्य परिषदेचे झाले आंदोलन

मुंबई,दि ११
चर्मोद्योग महामंडळाचे संपूर्ण थकीत कर्ज बिनशर्त सरसकट माफ करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील चर्मकार समाज बांधवांनी आझाद मैदान येथे लाक्षणिक आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले. चर्मकार ऐक्य परिषद संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन झाले.
राज्यात सुमारे ६० लाख चर्मकार समाज आहे. समाजाने सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. पण; त्याची अंमलबजावणी अनेक वर्षापासून झालेली नाही. संत रविदास महाराज यांच्या जयंतीची महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी, मध्यप्रदेशने सागर येथे १०० कोटी रूपये उपलब्ध करून संत रविदास महाराज यांचे स्मारक उभारत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात संत रविदास महाराजांचे स्मारक (विश्व विद्यालय) स्थापन करावे, संत रविदास महाराज यांचे जिल्हा व तालुकास्तरावर स्मारक व
विकास केंद्र उभारावे, देवनार (मुंबई) येथील आधुनिक लेदर पार्क व्हावे, याबाबत अर्थसंकल्प अधिवेशनात मंजुरीची घोषणा केलेली आहे. या प्रकल्पाचे तत्काळ काम सुरू करावे, आदी मागण्या असल्याचे चर्मकार समाज बांधवांनी सांगितले. आंदोलनात मुंबई जिल्हाध्यक्ष सुभाष मराठे, राज्य कार्याध्यक्ष वसंत धोडवे, महासचिव चंद्रकांत देगलूरकर, प्रियंका गजरे, पुजा कांबळे, अशोक कांबळे आदींचा सहभाग होता.KK/ML/MS