अकोल्यात आढळला दुर्मिळ ‘अल्बिनो मण्यार ‘!

अकोला दि ११:– अकोल्यात अत्यंत दुर्मिळ अशा अल्बिनो मण्यारला (Common Krait) पकडण्यात सर्पमित्राना यश आले आहे. जगात क्वचितच आढळणारा हा पांढराशुभ्र मण्यार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.सर्पमित्र सुरज इंगळे, अभय निंबाळकर यांनी या दुर्मिळ सापाला अत्यंत सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
अल्बिनो म्हणजे प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये किंवा अगदी माणसांमध्येही आढळणारी एक नैसर्गिक स्थिती आहे. या अवस्थेत शरीरात मेलेनिन नावाच्या रंगद्रव्याची (pigment) कमतरता असते किंवा ते अजिबात तयार होत नाही.
मेलेनिनमुळे त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग येतो. मेलेनिनच्या कमतरतेमुळे अल्बिनो असलेले प्राणी पूर्णपणे पांढरे किंवा फिकट रंगाचे दिसतात आणि त्यांच्या डोळ्यांचा रंग गुलाबी किंवा लालसर असतो. अल्बिनो असलेले प्राणी निसर्गात खूपच कमी आढळतात कारण त्यांचा पांढरा रंग त्यांना शिकार करण्यासाठी किंवा शिकारीपासून वाचण्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो.ML/ML/MS