गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य

मुंबई, दि १०
विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य असून विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी विशेष मेहनत करावी आणि आपले ध्येय गाठावे असे जाहीर प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले.
ही केवळ यशाची दखल नव्हे, तर पुढील वाटचालीसाठी दिलेली नवी ऊर्जा आहे. विद्यार्थ्यांच्या कष्ट, पालकांचा आधार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या सगळ्यांचा सन्मान करण्याचा हा एक सुंदर क्षण असून असेच कार्यक्रम यापुढेही राबवणार असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर, आकाश पुरोहित, जनक संघवी आणि इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. KK/ML/MS