सलग तीन दिवस संततधार पाऊस, गोसेखुर्द धरणाचे 33 दर उघडले….

भंडारा दि ९ :- भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून 43 मार्ग बंद झाले आहेत. 8 तारखेला ऑरेंज आणि 9 तारखेला येलो अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी यांनी काल 3 वाजेला पत्र काढून 8 आणि 9 तारखेला शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. भंडारा शहराजवळ लहान पुलाने धोक्याची पातळी ओलांडली असून पुलावरून 2 फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे भंडारा शहरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
कारधा,गणेश पुर या गावातील जवळपास 50 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थानांतरित करण्यात आलेले आहे. शहरातील बऱ्याच सकल भागामध्ये पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडालेली आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच घरांची पडझड झालेली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या सातही तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून धापेवाडा, पुजारी टोला या धरणाचे दार उघडले गेल्याने आणि गोसेखुर्द धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 33 ही दार उघडण्यात आलेले आहेत. यापैकी 12 दरवाजे 2.5 मीटरने तर 21 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आली आहेत. यातून 14956.32 क्युमेंक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नदी नाल्यांवर पाणी वाहत असताना नागरिकांनी ते पार करण्याचे प्रयत्न करू नये सेल्फीचा मोह आवरावा आणि घरी सुरक्षित राहावं अशी आव्हान सध्या शासनातर्फे केल्या जात आहे. ML/ML/MS