पानिपतच्या तरुणीने अमेरिकेत जिंकली 2 सुवर्णपदके

हरयाणा, दि. ७ : पानिपतमधील नौलथा गावातील तरुणी आणि ITBP मध्ये कॉन्स्टेबल असलेली नीतू जगलान हिने अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथे एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिने २१ व्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा २०२५ च्या कराटे स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात सुवर्णपदके जिंकली. नीतूचे हे पहिले आंतरराष्ट्रीय यश नाही. तिने २०१९ मध्ये चीनमध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०२३ मध्ये नेदरलँड्समध्ये रौप्यपदक जिंकले होते. सध्या ती हरियाणातील पंचकुला येथे आयटीबीपी (इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस) मध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
नीतूचे वडील समरजीत जगलान यांच्या मते, तिला लहानपणापासूनच कराटेची आवड होती. नीतूने तिच्या कुटुंबाला दिलेले वचन पूर्ण केले आहे आणि देश आणि गावाचे नाव उंचावले आहे. तिची आवड पाहून कुटुंबाने नेहमीच पूर्ण पाठिंबा दिला आहे. नीतूच्या या कामगिरीबद्दल गावात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
SL/ML