‘श्री रामायण यात्रा ‘ विशेष ट्रेनचा पाचवा दौरा सुरू

नवी दिल्ली, ७ : भारतीय रेल्वेच्या IRCTC द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामायण यात्रा’ विशेष ट्रेनच्या पाचव्या टप्प्याला २५ जुलैपासून दिल्ली सफदरजंग स्थानकावरून सुरुवात होणार आहे. ही १७ दिवसांची यात्रा भारत आणि नेपाळमधील ३० हून अधिक पवित्र स्थळांना भेट देणार आहे, जी प्रभू श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित आहेत. प्रवासी दिल्ली व्यतिरिक्त गाझियाबाद, अलीगढ, लखनऊ, कानपूर, झाँसी, मथुरा आणि आग्रा कँट येथूनही ट्रेनमध्ये चढू शकतात. ही यात्रा आयआरसीटीसीच्या ‘भारत गौरव’ उपक्रमाचा भाग आहे, ज्याचा उद्देश भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जतन व प्रचार करणे आहे.
यात्रेची वैशिष्ट्ये
🔹 प्रारंभ बिंदू: दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानक
🔹 ट्रेन: भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन
🔹 कालावधी: १७ दिवस
🔹 एकूण स्थळे: ३० पेक्षा अधिक
प्रमुख स्थळांची यादी
राज्य / देश स्थळे
उत्तर प्रदेश अयोध्या (राम जन्मभूमी, हनुमान गढी), नंदिग्राम, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट
बिहार सीतामढी (सीतेचे जन्मस्थळ), बक्सर (रामरेखा घाट, रामेश्वरनाथ मंदिर)
नेपाळ जनकपूर (राम जानकी मंदिर)
महाराष्ट्र नाशिक (त्र्यंबकेश्वर, पंचवटी)
कर्नाटक हम्पी (अंजनेय डोंगर, विठ्ठल व विरुपाक्ष मंदिर)
तमिळनाडू रामेश्वरम (रामनाथस्वामी मंदिर, धनुषकोडी)
तिकीट दर (प्रति प्रवासी)
श्रेणी दर (₹)
3 AC ₹1,17,975
2 AC ₹1,40,120
1 AC कॅबिन ₹1,66,380
1 AC कूपे ₹1,79,515
यात्रेत समाविष्ट सेवा
निवडलेल्या श्रेणीत रेल्वे प्रवास
3-स्टार हॉटेलमध्ये निवास
शाकाहारी भोजन
वातानुकूलित बसद्वारे स्थानिक दर्शन
प्रवास विमा
आयआरसीटीसी टूर मॅनेजरची सेवा
SL/ML