बोगस अंगणवाडी सेविका, दोन अधिकारी निलंबित…

 बोगस अंगणवाडी सेविका, दोन अधिकारी निलंबित…

मुंबई दि ७ — नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या अंगणवाडीत प्रत्यक्ष नियुक्त सेविकेऐवजी तिच्या नातेवाईक स्त्री ने खोटी कागदपत्रे सादर करून मूळ सेविकेचा पगार हडप केल्याप्रकरणी विधानसभेत मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांमध्ये जोरदार चकमक उडाली अखेर दोन अधिकारी निलंबित करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली.

या प्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९९६ पासून सुरू होता , फसवणूक करणारी महिला तिची जवळची नातेवाईक आहे असे मंत्री वारंवार सांगत होत्या. मात्र यात अधिकाऱ्यांचा सहभाग आहे , त्यांना तातडीने निलंबित करण्याची जोरदार मागणी सत्तारूढ सदस्यांनीच केली. यामुळे अखेर संबंधित प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

याबाबतची लक्षवेधी सूचना आमश्या पाडवी यांनी उपस्थित केली होती , त्यावर सुरेश धस यांच्या सह अनेक सदस्य आक्रमक झाले होते. मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने त्याचं समाधान होत नव्हतं , अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांची मागणी होती, अखेर मंत्री तटकरे यांनी दोन अधिकारी निलंबित करण्याची घोषणा केली. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *