सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर

सिंधुदुर्ग दि ३ — जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. गड नदीने इशारा पातळी ओलांडली असून कर्ली नदी इशारा पातळी जवळ वाहत आहे. तिलारी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तेथे लवकरच विसर्ग सुरू केला जाणार असल्याने तिलारी नदीकाठच्या क्षेत्रातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात आणि परिसरात घुसल्याने अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाले आहेत .
डॉ.आंबेडकर नगर मध्ये वस्तीत पाणी शिरले आहे. कुडाळ स्टेशन कडे जाणारा रस्ता पाणी भरल्याने बंद झाला आहे. कणकवली तालुक्यात कोल्हापूर आचरे मार्गावर वरवडे येथे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 139.87 मिलिमीटर पाऊस सरासरीने झाला आहे .सर्वात जास्त पाऊस कणकवली तालुक्यात 220 मिलिमीटर एवढा झाला आहे.ML/ML/MS