Ola, Uber सेवेसाठी गर्दीच्या द्यावे लागणार दुप्पट भाडे

मुंबई, दि. २ : ऑफिसच्या प्रवासात किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळेत ओला, उबर किंवा रॅपिडोने प्रवास केलात तर आता तुमच्या खिशावर अधिक भार पडू शकतो. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्या अंतर्गत अॅप-आधारित टॅक्सी कंपन्या आता गर्दीच्या वेळेत मूळ भाडे दुप्पट आकारू शकतील. केंद्र सरकारने मंगळवारी मोटार वाहन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे (MVAG) २०२५ जारी केली. याअंतर्गत, ओला, उबर, रॅपिडो आणि इनड्राइव्ह सारख्या कॅब कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट (२x) पर्यंत आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा १.५ पट होती. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुढील तीन महिन्यांत, म्हणजे सप्टेंबर २०२५ पर्यंत हे नवीन नियम लागू करण्याचा सल्ला दिला आहे.
गर्दीच्या वेळेस रस्त्यावर जास्त वाहतूक असते किंवा कॅबची मागणी वाढते, जसे की सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी किंवा खराब हवामानात, असे म्हणतात. नवीन नियमांनुसार, गर्दी नसलेल्या वेळेत (जेव्हा मागणी कमी असते) भाडे मूळ भाड्याच्या किमान ५०% असेल. म्हणजेच, जर मूळ भाडे १०० रुपये असेल तर किमान ५० रुपये द्यावे लागतील. बेस फेअर म्हणजे कॅब, ऑटो-रिक्षा किंवा बाईक टॅक्सीसाठी निश्चित केलेले बेसिक भाडे. हे भाडे वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारांद्वारे ठरवले जाते.