देशातील पहिल्या दिव्यांग Iron Man चा इमारतीवरून पडून मृत्यू

 देशातील पहिल्या दिव्यांग Iron Man चा इमारतीवरून पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर, दि. २ : जगातील पाचवे आणि देशातील पहिले दिव्यांग आयरन मॅन म्हणून ओळख असलेल्या निकेत दलाल यांचा मृत्यू झाला आहे. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती आहे. निकेत दलाल हे माजी उपमहापौर लता दलाल यांची पुत्र होते. या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

निकेत श्रीनिवास दलाल हे 43 वर्षांचे असून ते खडकेश्वर येथे राहत होते. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, 30 जून रोजी रात्री निकेत दलाल यांच्या घराला आग लागली होती. आग लागलेली असल्यामुळे रात्री तिथे थांबणे योग्य नसल्याने निकेत दलाल यांना मित्रांनी कार्तिकी हॉटेलमध्ये सोडलं. मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास निकेत कार्तिकी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पडलेले आढळून आले.

या घटनेनंतर हॉटेल मालकाने तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली आणि रुग्णावाहिका बोलावण्यात आली. निकेत यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. निकेत यांच्या अंगावर जखमा आढळून आल्याची माहिती क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली आहे.

आयर्नमॅनची अनोखी कामगिरी

निकेत दलाल हे दुसरीत असताना त्यांच्या डोळ्याला सायकलचा स्पोक लागला. या घटनेमुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी केली. नंतर काही वर्षातच दुसऱ्या डोळ्याला देखील ल्यूकेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले. दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली असली तरी निकेत यांची जिद्द मात्र कायम होती. 2020 मध्ये दुबई येथे दीड किलोमीटर जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग, 21.1 किलोमीटर धावणे अशा पद्धतीने दिव्यांग आयरन मॅन स्पर्धेत देशात पहिले येण्याचा मान त्यांनी मिळवला. तसेच, याच स्पर्धेत जगात पाचवा आयरन मॅन होण्याचा मान देखील निकेत यांनी पटकावला होता.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *