मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची प्रक्रिया होणार सुलभ

 मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची प्रक्रिया होणार सुलभ

मुंबई दि २ — मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग मध्ये रूपांतरित करण्यासाठी सध्याची प्रचलित क्लिष्ट पद्धती अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल, त्यासाठी मुंबईतील वरिष्ठ आमदारांशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती, त्यावर योगेश सागर, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार आदींनी उपप्रश्न विचारत या पद्धतीतील अनेक अडचणी लक्षात आणून दिल्या.

जमीन रूपांतरण करण्यासाठी रेडी रेक्नरच्या दहा टक्के इतकी रक्कम आकारण्यात येते ती प्रधानमंत्री आवास योजनेच्या नुसार पाच टक्के आकारण्यात येईल असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यावर असणाऱ्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी अथवा व्यावसायिक वापर करण्यासाठी त्या वर्ग एक न करताही कोणतीही रक्कम न भरता केवळ संबंधित जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊनही करता येईल अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. आमच्या विभागाचे काम केवळ जमीन वापर बदलणे इतकेच असून त्यावरील चटईक्षेत्र उल्लंघन ही बाब यावेळी बघण्याचे कारण नाही असेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *