सत्तारूढ आणि विरोधक भिडले, कामकाज तहकूब

मुंबई दि २ — आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांना आज लोणीकर यांनी सभागृहात उत्तर दिलं, त्यावर विरोधकांनी घोषणा दिल्या त्यामुळे गोंधळ उडाला. त्याला सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी घोषणाबाजीने गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दहा मिनिटे स्थगित झालं.
आपण शेतकरी विरोधी नाही , असं वक्तव्य आपण केलंच नाही मात्र तरीही आपण शेतकऱ्यांची हजार वेळा त्यांची माफी मागायला तयार आहोत असं लोणीकर म्हणाले. त्याचं वक्तव्य सुरू असतानाच विरोधी सदस्य आक्रमक झाले त्यांनी जागा सोडत घोषणाबाजी सुरू केली, त्यावर सत्तारूढ सदस्य ही जागा सोडून पुढे आले, त्यांनी देखील घोषणा सुरू केल्या त्यामुळे गदारोळ झाला आणि पीठासन अधिकारी समीर कुणावर यांनी कामकाज स्थगित केलं.ML/ML/MS