शेतकऱ्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा दुसरा सभात्याग

मुंबई दि २ — शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडण्याचा शेताचा प्रयत्न यावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला त्यावर ही गंभीर स्थिती आहे त्यामुळे आताच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करा अशी जोरदार मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली, उद्या स्वतंत्र प्रस्ताव द्या त्यावर चर्चा करू असं ते म्हणाले. यावर केवळ विरोधी सदस्यांनाच शेतकऱ्यांची काळजी असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र सरकार ही चर्चेला तयार आहे, आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दिलं. मात्र याचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. ML/ML/MS