वीज कोसळण्याच्या घटनांपासून रोखण्यासाठी नवे ऍप…

मुंबई दि २ — राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांपासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी दामिनी आणि सचेत हे दोन ऍप केंद्र सरकारच्या IITM संस्थेने विकसित केले असून त्याव्यतिरिक्त आणखी एक आधुनिक ऍप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
सध्याच्या ऍप मधून चारशे किलोमीटर परिसरातील वीज कोसळण्याची माहिती मिळते मात्र आता चारशे मीटर परिसरातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मंत्री म्हणाले. याबाबतचा मूळ प्रश्न संतोष दानवे यांनी उपस्थित केला होता, त्यावर भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, समीर कुणावर आदींनी उपप्रश्न विचारले. ML/ML/MS