ओव्हरटाईम करु नका, आरोग्य सांभाळा – इन्फोसिस प्रमुखांचा सल्ला

 ओव्हरटाईम करु नका, आरोग्य सांभाळा – इन्फोसिस प्रमुखांचा सल्ला

बंगळुरु, दि. १ : आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे असे वक्तव्य करून खळबळ माजवणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या प्रमुखांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ निर्धारित वेळेतच काम करुन तब्येतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईमही करू नये. इन्फोसिसमध्ये दुरस्थ पद्धतीने काम करणाऱ्यांनी कामाच्या वेळांचे तंतोतत पालन करावे व अधिक वेळ काम करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

इन्फोसिसच्या मनुष्यबळ विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात व्यक्तगत ईमेल पाठवले आहेत. या ईमेलमध्ये म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून पाच दिवस दररोज केवळ सव्वानऊ तास काम करावे. त्यावर काम करु नये. त्याचप्रमाणे ओव्हरटाईम न करता आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेष करुन दुरस्थ पद्धतीने काम करणाऱ्यांनी दिवसातून अधिक वेळ काम करणे टाळावे. काम व जीवन यातील संतुलन साधावे. हे संतुलन साधणे केवळ कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत आरोग्यासाठीच आवश्यक नाही तर त्यामुळे त्यांची कार्यक्षमता दीर्घकालीन राहिल. कामाव्यतिरीक्तच्या तासांमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःला ताजेतवाने करावे त्याचप्रमाणे कार्यालयीन चर्चाही कमी कराव्यात.

गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे आढळून आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने २० नोव्हेंबर २०२३ पासून कार्यालयात परत चला हे धोरण अवलंबले असून दुरस्थ पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांची संख्या कमी केली आहे. कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान १० दिवस तरी कार्यालयातून काम करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुरस्थ पद्धतीने ते किती तास काम करतात याचीही नोंद ठेवली जात आहे. इन्फोसिसमध्ये सध्या ३ लाख २३ हजार कर्मचारी असून अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या वेळांमधील बदल व ताणामुळे त्यांच्यात हृदयरोग व इतर तक्रारी वाढत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *