पोंझी योजनांवर पोलिसांची कारवाई सातत्याने सुरु…

मुंबई दि १ — अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे, अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उपप्रश्न विचारले.
अधिकचे व्याजदर कोणीही देत नाही, तेव्हा अशा फसव्या योजनांवर जनतेने विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आर्थिक गुन्हे शोधून काढणे आणि त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे असे ही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात प्रदूषण करणाऱ्या ३०४ उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर ३१८ उद्योगांवर ते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबतचे दोन स्वतंत्र प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, ते भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर उभारलेल्या होर्डिंग्ज वरील जाहिरातीसाठी संबंधित ठेकेदाराने सुमारे साडे नऊ कोटींची रक्कम भरणा केलेली नाही, त्याने यावरील नोटीसला उत्तरही दिलं नाही त्यामुळे त्याची नऊ कोटींची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली, याबाबतचा प्रश्न शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता. ML/ML/MS