Straight Bat ’ने आणली AI आधारीत स्मार्ट बॅट

 Straight Bat ’ने आणली AI आधारीत स्मार्ट बॅट

मुंबई : देशातील आघाडीचा स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी ब्रँड असणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’ने अद्वितीय आणि क्रांतिकारी एआयवर (कृत्रिम बुद्धिमकता) आधारित स्मार्ट स्टीकर सादर केले असून, ते कोणत्याही क्रिकेट बॅटचे रूपांतर परफॉर्मन्स ॲनालिटिक्स साधनात करण्यास सक्षम आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान या बॅटचे अनावरण करण्यात आले.

सध्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने क्रिकेट विकसित होत आहे. फलंदाजाने धावा किती केल्या व गोलंदाजाने किती विकेट मिळवल्या. यापेक्षाही त्याची बॅट स्विंग किती होती, त्याच्या फटक्यांमध्ये किती ताकद होती. यांसारख्या गोष्टींचा आढावा या बॅटद्वारे घेणे सोपे जाईल. भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांसारख्या खेळाडूंनी या बॅटला परिषदेत पाठिंबा दिला. तसेच महिलाही या बॅटचा वापर करू शकतात, असे सांगण्यात आले. या परिषदेसाठी स्ट्रेटबॅटचे सीईओ गगन डागा व सहसंस्थापक मधू सुदनही उपस्थित होते.

कॅमेऱ्याशिवाय चालणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’च्या च्या ‘एलिव्हेट’ तंत्रज्ञानावर आधारित हे वजनाने अतिशय हलके स्टीकर फलंदाजाला रिअल टाइममध्ये बॅटचा वेग, स्विंग अँगल, इम्पॅक्ट झोन आदींची माहिती देते.

“या तंत्रज्ञानामुळे देशातील युवा खेळाडू आता त्यांच्या खेळाचे अचूक विश्लेषण प्राप्त करू शकतात. एके काळी हा अनुभव केवळ व्यावसायिक खेळाडूंनाच मिळत होता. हे तंत्रज्ञान गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून माझ्या अकादमीत अगदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतही या तंत्रज्ञानाचा वापर करीत असून त्याचा परिणाम दिसून येत आहे,” असे किरण मोरे म्हणाले.

“मी टेकसॅव्ही माणूस नाही; पण बडोद्यात हे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. बॅटचा वेग आणि वेळेचा मागोवा घेण्यापासून ते हेड पोझिशन आणि बॅलन्सपर्यंत हे तंत्रज्ञान नवख्या व व्यावसायिक अशा प्रत्येक स्तरावरील खेळाडूंना मदत करते. क्रिकेट ऑस्ट्रेलियासारख्या प्रमुख संघटनांकडून याचा अवलंब करण्यात येत आहे. दिवसेंदिवस क्रिकेट आधुनिक होत असून, हे तंत्रज्ञान त्याचाच एक भाग आहे,” असेही त्यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *