डॉ गजानन आणि डॉ स्मृति रत्नपारखी यांचा झाला जाहीर सत्कार

 डॉ गजानन आणि डॉ स्मृति रत्नपारखी यांचा झाला जाहीर सत्कार

मुंबई, दि २६
डॉ”अस्मिता” (जोगेश्वरी- मुंबई) या सामाजिक शैक्षणिक , सांस्कृतिक व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान करणारे डॉ.गजानन रत्नपारखी व डॉक्टर स्मृती रत्नपारखी*
यांचा संस्थेचे सरचिटणीस विश्वस्त श्री राजन चाचड व मुख्याध्यापक फडतरे सर* यांच्या उपस्थित जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरुकृपा हार्ट फाउंडेशन व चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने अस्मिता माध्यमिक विद्यालयातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या व दफ्तरचे वाटप करण्यात आले.आम्ही नेहमीच समाजात चांगले कार्य करत असतो. अनेक विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देत असतो. कोणीही विद्यार्थी पैशा अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये ही आमची अपेक्षा असल्याची माहिती गजानन रत्नपारखी यांनी दिली. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *