महिला क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन क्रिकेटप्रेमी देशांमध्ये होत आहे. पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा तब्बल ३५ दिवस चालणार असून विविध शहरांतील नामांकित स्टेडियम्समध्ये सामने रंगतील. क्रिकेटप्रेमींसाठी सर्वाधिक उत्सुकता असलेला सामना भारत-पाकिस्तान यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे रंगणार आहे.
८ संघ या विश्वचषकात सहभागी होत असून लीग स्वरूपात सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळेल आणि गुणतालिकेतील सर्वोच्च चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीतील विजयी संघ २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरी खेळतील. विश्वचषकाचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी बंगळुरू किंवा कोलंबो येथे खेळवला जाईल.