देशातील सर्व बोईंग ७८७ जेट्सवर देखरेख ठेवण्याचे DGCA आदेश ; ८ विमानांची तपासणी पूर्ण

 देशातील सर्व बोईंग ७८७ जेट्सवर देखरेख ठेवण्याचे DGCA आदेश ; ८ विमानांची तपासणी पूर्ण

नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज माहिती दिली की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) भारतीय विमान ताफ्यात सध्या असलेल्या ३४ बोईंग ७८७ विमानांची विस्तारित देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी आठ विमानांची तातडीने तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आज नवी दिल्लीत माध्यमांना माहिती देताना मंत्र्यांनी माहिती दिली की, या घटनेच्या चौकशीसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात येत आहे. गृह सचिव या समितीचे अध्यक्ष असतील.

मंत्र्यांनी सांगितले की, अपघातानंतर लगेचच, विमान अपघात तपास ब्युरो, जो विशेषतः विमानांभोवती होणाऱ्या अपघातांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता, त्याला तैनात करण्यात आले.

त्यांनी पुढे सांगितले की, एएआयबीने विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे, जो अपघातादरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये प्रत्यक्षात काय घडले असेल याची सखोल माहिती देणार आहे. श्री. नायडू पुढे म्हणाले की, सर्व संबंधित विभागांच्या प्रतिसाद पथके आग विझविण्यासाठी आणि मृतदेह रुग्णालयात पाठवण्यासाठी जमिनीवर काम करत आहेत. त्यांनी असेही सांगितले की, पीडितांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *